महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer

Women Health | महिलांमध्ये सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणात अधिक वाढ होत असल्याचं चित्र दिसून येतंय. अलीकडेच अभिनेत्री हिना खान हीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे महिलांनी या आजाराबाबत जागृत होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यायामाचा अभाव, कामाचा ताण यासारख्या गोष्टींमुळे महिलांमध्ये तणाव निर्माण होतो. यामुळे महिलांच्या शरीरातील काही हार्मोन्सचे (Women Health) असंतुलन होते. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू लागतो.

स्तनांचे आरोग्य आणि हार्मोन्स

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांनी स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्तनामध्ये गाठ, काखेत गाठ, स्तनाच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणे, अशी लक्षणे महिलांनी दुर्लक्षित करू नयेत.

महिलांनी मुख्यतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे संतुलन राखण्याकडे लक्ष द्यायला हवे. हे दोन हार्मोन्स ब्रेस्ट कॅन्सरमागील मुख्य कारणे असतात. शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स स्तनाच्या ऊतींच्या वाढीवर परिणाम करतात. त्यामुळे ही दोन हार्मोन्स संतुलन राखण्याकडे भर (Women Health) द्यायला हवा.

हार्मोन्स संतुलित करण्यासाठी ‘ही’ पदार्थ खा

हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी आहारात हरभऱ्याचा समावेश करा. ते व्हिटॅमिन बी 6 मध्ये समृद्ध आहेत आणि प्रोजेस्टेरॉनच्या उत्पादनास मदत करतात.
ब्रोकोलीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करा.
भोपळ्याच्या बिया हार्मोनल बॅलेन्ससाठीही खूप फायदेशीर ठरतात.
सूर्यफुलाच्या बिया देखील गुणांनी (Women Health) परिपूर्ण आहेत. हे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी संतुलित करतात.

News Title –  Women Health causes of breast cancer

महत्त्वाच्या बातम्या-

कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमद्वारे महिन्याला कमवा 10 हजार रुपये; जाणून घ्या अधिक

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची धुरा कुणाकडे असणार?, मोठी माहिती आली समोर

“लाडका भाऊ योजना ही 50 वर्षांआधीची जुनी योजना”; ‘या’ नेत्याचा दावा

“माझ्यासोबत धोका..”, लग्नाच्या काही दिवसांनीच सोनाक्षीच्या नवऱ्याने केलं असं काही की..