पुणे | महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडल्याने धोका वाढला होता. राज्यात पुणे जिल्ह्यातील बेलसर गावामध्ये झिकाचा रूग्ण सापडला होता. झिकाचा संसर्ग गर्भातील बाळाला झाला तर बाळाला व्यंगत्व येण्याची शक्यता असते. या भीतीने गावात संसर्ग वाढू नये म्हणून गावातील लोकांना पुढील 3 महिने महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
ज्या महिला गरोदर असतात त्यांच्या गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकास कमी होतो. त्यामुळे गावातील इतर महिलांना गरोदर न राहण्यासाठी सूचना दिल्या दिल्या आहेत. झिका आजाराचा संसर्ग दोन प्रकारे होऊ शकतो. मच्छर चावल्यामुळे, चावलेला मच्छराला एडिसचा संसर्ग झालेला असतो. दुसरा म्हणजे शारीरिक संबंधातूनही झिका व्हायरसचा संसर्ग होतो.
पुरूषाच्या सीमन्समध्ये चार महिने झिका व्हायरस जिवंत राहू शकतो. त्या पुरूषाचा शारीरिक संबंध झाल्यानंतर त्या महिलेच्या गर्भातील बाळाला झिका व्हायरसची लागण झालेली असणार आहे. त्यामुळे चार महिने गर्भधारणा ठेवू नका, असं बेलसरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी सांगितलं.
दरम्यान, झिका व्हायरस झालेल्या बाळाच्या मेंदूचा आकार कमी असतो. लवकर गर्भधारणा होऊ शकते याच्यात मृत्यु होऊ शकतो अशा प्रकारची लक्षणे केरळमध्ये आढळली असल्याचं भरत शितोळे यांनी सांगितलं. या गावातील ज्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती ती महिला बरी झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यपालांना परिस्थिती आणि जबाबदारीचं भान असावं – मुंबई उच्च न्यायालय
विनावर्दी कारवाई करणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश!
बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा देत मोदींनी सांगितली 40 वर्षांपूर्वीची आठवण, म्हणाले…
“रानडे इन्स्टिट्यूटवर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरुय, आम्ही तो हाणून पाडू”
रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडू- उदय सामंत
Comments are closed.