बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

नाशिक | नाशिक येथील मनमाड येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. सासू-सुनेच्या नात्याचं एक वेगळंच उदाहरण देणारी ही घटना आहे. सासू विहिरीत पडल्यानंतर सासूला वाचवण्यासाठी सुनेनं आपल्या साडीचा पदर विहिरीत सोडला. मात्र क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि सुन देखील विहिरीत पडली. दुर्दैवी बाब म्हणजे संबंधित सून ही गर्भवती होती.

संबंधित सुनेचं नाव मनीषा सचिन पवार असं असून सासूचं नाव गयाबाई अशोक पवार असं आहे. मनीषा ही केवळ 20 वर्षाची असून तिच्या मागे तिला एक 8 वर्षाचा मुलगा आणि 4 वर्षाची मुलगी आहे. विहिरीवर पाणी भरायला गेले असताना गयाबाई विहिरीत पडल्या.

आपल्या सासूला वाचवण्यासाठी मनिषाने आजू-बाजूला जावून आरडा ओरडा केला. मात्र कोणीच न आल्याने मनिषाने आपल्या साडीचा पदर सोडून सासूला वर खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक मनिषाचा तोल गेला आणि ती देखील विहिरीत पडली. दोघींनाही पोहता येत नसल्याने दोघींचाही अंत झाला.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी गयाबाई आणि मनिषा घरी न आल्याने त्यांना शोधण्यासाठी धाव घेण्यात आली. यावेळी दोघींचाही विहरीत मृतदेह तरंगताना दिसला. पोलीस आता याबाबत अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More