बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपर लेडी! तालिबानच्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर ‘ती’ निडरपणे राहिली उभी

काबूल | अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.  अशातच आता काबूलमध्ये मंगळवारी तालिबानविरोधात हजारो महिलांनी पाकिस्तानच्या दुतावासासमोर तीव्र आंदोलन केलं. तेथील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यामध्ये एक महिला बंदूकधारी दहशतवाद्यासमोर निडरपणे उभी राहिलेली दिसत आहे.

अफगाणिस्तानमधील फ्रिबा काबरजानी या महिलेच्या नेतृत्वाखाली महिलांनी राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शने केली होती.  महिलांना नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली होती. मंगळवारी अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या राजदूतावासासमोर महिलांनी आंदोलन केलं.  टोलो न्युजच्या पत्रकार जहरा रहिमी यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. त्यात एका महिलेवर दहशतवादी बंदूकचा नेम धरून उभा आहे. तरी ती महिला निडरपणे त्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर उभी आहे.  हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे.

महिलांनी केलेल्या आंदोलनावेळी गर्दीला पांगवण्यासाठी तालिबानकडून गोळीबार करण्यात आला होता. यावेळी चीनमध्ये 1989 साली तियानमेन चौकात झालेल्या आंदोलनाची आठवण झाली आहे. जहरा रहिमी यांनी फोटो ट्विट करत त्यामध्ये त्यांनी एक अफगाण महिला निडरपणे तालिबानच्या त्या हत्यारबंद जवानासमोर उभी आहे. ज्याने तिच्या छातीवर बंदूक रोखली आहे, जहरा रहिमी त्या म्हणाल्या.

दरम्यान, आतापर्यंत तालिबानविरोधात महिलांनी जवळपास तीन ते चार मोर्चे काढले आहेत. तालिबान महिलांविरूद्ध क्रूरपणे वागत असल्याचा या अगोदर अनुभव आहे. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल पंपावर आमदाराची फसवणूक, डिझेल भरल्यावर काही अंतरावरच बंद पडली गाडी

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

चीनची तालिबानला मोठी आर्थिक मदत; मदतीच्या रकमेचा आकडा वाचून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More