बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला!

उस्मानाबाद | उस्मानाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या राहत्याघरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेने मरण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहील्याने एकच खळबळ माजली आहे. उस्मानाबादमधील एका पोलिस कर्मचाऱ्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं तिने लिहीलं आहे.

उस्मानाबाद पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने सदरील महिलेवर बंदुकीचा धाक दाखवुन वारंवार बलात्कार केला असल्याचा खुलासा त्या महिलेने आत्महत्येपुर्वी एका चिठ्ठीतून केला आहे. पोलिस दलातील या कर्मचाऱ्यामुळेच सदरील महीलेनं आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.

संबंधित आरोपीने सप्टेंबर 2020 पासून वेळोवेळी आपल्या पत्नीवर बंदुकीचा धाक दाखवुन बलात्कार केला असल्याचं तिच्या पतीने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात होणारे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसुन येत आहे. त्यातच अनेक घटना उघडकीस येत आहेत. औरंगाबादच्या पदमपुरा भागात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेवर तिथे उपस्थित असलेल्या राऊंड घेणाऱ्या डॉक्टरने रात्रीचा फायदा घेत अतिप्रसंग केल्याची घटना ताजी असतानाच आता उस्मानाबादच्या या महिलेच्या आत्महत्येनं महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More