बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल

उत्तराखंड | मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना प्रभू श्रीरामाशी केल्यानंतर रावत यांनी एका कार्यक्रमात अजून एक वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,’ असं वक्तव्य मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर केलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटनप्रसंगी बोलताना रावत यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारांना आई-वडील जबाबदार असतात, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी विमान प्रवासातील एक अनुभव सांगितला.

एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळच घेऊन बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं तुम्ही कुठे जात आहात? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. मी पुढे चौकशी केली तर त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते, असं रावत यांनी सांगितलं.

दरम्यान, माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं काही नव्हतं असं रावत बोलताना म्हणाले. त्यासोबतच तरुणांमध्येही व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यामुळे नशेबरोबरच आपल्याला सर्व वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवूत संस्कारी बनवावं लागेल. तर पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासूनही दूर राहावं लागेल, असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

कोरोना लसीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर उचलला हात, सहन न झाल्याने माऊलीने सोडला प्राण, पाहा व्हिडीओ

‘सिंघम’ मधील काजल अग्रवालचं हॉट फोटोशूट, पाहा तिचे अदाकारी फोटोझ!

कुस्तीत झालेला पराभव सहन झाला नाही; फोगट भगिनींच्या बहिणीनं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More