बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरी बसून महिलांना फावल्या वेळात काम करण्याची संधी मिळणार!

पुणे | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य लोकांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागत आहे. अशातच महिलांना घरची कामं उरकून झाल्यावर फावल्या वेळात काम करण्याची मिळणार आहे.

‘स्पर्श’ संस्थेच्या माध्यमातून महिलांना आपल्या संसारासाठी हारभार लावण्यासाठी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामधी गादी शिवणे, डाळी, मसाला, रांगोळी इत्यादी वस्तूंची पॅकिंग कारण्याचे काम महिलांना करावे लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी, कच्चा माल, भांडवल हे सगळं संस्थेमार्फत पुरवले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा चंदा बोरकर यांनी दिली.

खडकी, बोपोडी, सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव या भागातील महिला व पुणे शहरातील कुठल्याही भागातील महिलांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. स्पर्श संस्थेचे अध्यक्ष सुनील बुट्टे पाटील, उपाध्यक्ष चंदा बोरकर, परिमल कडलक, योगेश कदम, पुष्पलता वायाळ यांची बैठक टस्मॉल स्केल इंडस्ट्रीज’चे अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील कार्यालयात पार पडली.

दरम्यान, कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. पुण्यात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

बालिका वधू फेम सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक

…म्हणून कंगणाच्या आईने मानले अमित शहा यांचे आभार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More