आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

Asia Cup 2024 | सध्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून एकूण 4 संघांमध्ये 27 जूनपासून सेमी फायनलला सुरुवात होणार आहे. तर, 29 जूनरोजी टी 20 वर्ल्ड कप सामन्याचा अंतिम सामना होईल. त्यापूर्वीच आशियाई क्रिकेट परिषद अर्थात एसीसीने वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलंय.

या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेचा 10 दिवस थरार रंगणार आहे. 19 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आशिया कपमधील सर्व मॅचेस श्रीलंकेतील दांबुला येथे खेळवल्या जाणार आहेत.

आशिया कपचं वेळापत्रक जाहीर

स्पर्धेतील पहिला सामना यूएई आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. याच दिवशी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानच्या महिला टीमसोबत होईल. वूमन्स आशिया कप स्पर्धेमुळे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ असलेले टीम इंडिया-पाकिस्तान स्पर्धेत समोरा-समोर येतील.

महिला आशिया कपची फायनल मॅच 28 जुलैरोजी होईल. महिला आशिया कपमध्ये भारतीय महिलांनी आतापर्यंत सातवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2018 मध्ये बांगलादेशने आशिया कप जिंकला होता. तेव्हा बांगलादेशने टीम इंडियाचा तीन विकेट्सने पराभव केला होता. यानंतर 2022 मध्ये पुन्हा भारताने (Asia Cup 2024) बाजी मारली.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

भारत vs पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता
भारत vs यूएई, दुपारी 2 वाजता
भारत vs नेपाळ, संध्याकाळी 7 वाजता

सेमी फायनल 26 जुलै होईल. त्यानंतर (Asia Cup 2024) 28 जुलैला फायनल सामना होईल.

News Title –  Womens Asia Cup 2024 Schedule Announced

महत्त्वाच्या बातम्या-

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?

“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”

“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

वयाच्या 50 शीत मलायकाला प्रेमात मिळाला धोका?; अर्जुनच्या वाढदिवशी केली क्रिप्टिक पोस्ट