बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

इस्लामाबाद | महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. यापूर्वीही इम्रान खान यांनी असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला होता.

‘अ‍ॅक्सिओस ऑन एचबीओ’ ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले, जर एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. ही केवळ शहाणपणाची बाब आहे. इम्रान खानच्या या टीकेनं सोशल मीडियावर त्याचा संताप पसरला आहे.

यापूर्वीही इम्रान यांनी बलात्कारामागे बॉलिवूड, छोटे कपडे ही कारणं असल्याचं अनेकदा म्हटलं आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचं वारंवार सांगितल्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीव्र टीका केला जात आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयीन आयोगाच्या दक्षिण आशियातील कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी ट्विट केले आहे की, पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या कारणांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पीडितेला दोष देणे. हे अत्यंत निराशाजनक विधान आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं हे विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

देशातील नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा घटला, वाचा आजची आकडेवारी

“केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढवणार”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More