महिला दिन 2025 शुभेच्छा : तुमच्या आयुष्यातील ‘ती’चं या शब्दांनी करा कौतुक!

Womens Day 2025 Wishes Messages

Womens Day 2025 | दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Womens Day 2025 ) साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण, त्यांच्या उपलब्धींचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी समर्पित आहे. समाजातील प्रत्येक स्तरावर महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्या देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत. या विशेष दिनी आपल्या जीवनातील स्त्रियांना शुभेच्छा देण्यासाठी काही प्रेरणादायी संदेश.

महिला दिन शुभेच्छा संदेश:

1. आई प्रेमाची मूर्ती, बहिण मायेचा आधार,
नारीशक्तीचं करा पूजन, तीच जीवनाचा आधार!

2. स्मितहास्याने दुःख विसरते,
नाती जपते, विश्व उजळते,
ती म्हणजे नारी—एक शक्ती!

3. नारी म्हणजे एक शब्द नाही,
तर संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे!

4. तुमचा समजूतदारपणा व धैर्य
जगाला एक चांगलं स्थान बनवते,
अशाच चमकत राहा
महिला दिनाच्या शुभेच्छा!

5. तुमचं धैर्य आणि दयाळूपणा
आम्हाला जगण्याची प्रेरणा देतो,
स्वप्नपूर्तीसाठी नवे बळ देते
महिला दिनाच्या शुभेच्छा!

6. स्त्री ही पुरुषाची शक्ती आहे,
स्त्री हे घराचे सौंदर्य आहे,
त्याला योग्य आदर मिळावा,
घरात आनंदाची फुले उमलतील.
महिला दिनाच्या शुभेच्छा (Womens Day 2025 )

Title : Womens Day 2025 Wishes Messages

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .