नवी दिल्ली | विज्ञानाने हल्ली प्रचंड प्रगती केली आहे. अगदी अंतराळात पोहण्यापासून ते मुलं न होणाऱ्या दांपत्यासाठी आयवीएफ (IVF) तंत्रज्ञानाने मूल होण्यास मदत करणे. मुल होण्यासाठी स्त्रीच्या गर्भात भ्रुण तयार होणं गरजेचं आहे, मात्र आम्ही तुम्हाला सांगितलं तर आता अंतराळात मानवी भ्रुण तयार होणार आहे. विश्वास बसणार नाही मात्र हे शक्य होणार आहे.
हे तंत्रज्ञान 2028 पर्यंत अस्तित्वात येणार आहे. बाळाचा जन्म मात्र पृथ्वीवर होणार आहे. iNews च्या अहवालानुसार, ब्रिटीश शास्त्रज्ञ डच कंपनी Spaceborn United सोबत असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नाॅलाॅजी इन स्पेस (Reproduction Technology in Space) माॅड्यूल तयार करण्यासाठी काम करत आहेत. याअंतर्गत एक जैव उपक्रम अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
त्यामध्ये इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन उपचाराद्वारे भ्रूण (embryo) जन्माला येतील. ते पृथ्वीवर आणून स्त्रीच्या गर्भात पाठवले जातीत. पृथ्वीवर जन्माला आलेल्या या मुलांना ‘स्पेस बेबी'(Space Baby) म्हणलं जाणार आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्टे पृथ्वीच्या बाहेर नैसर्गिकरित्या मूले निर्माण करणं आहे. असं स्पेसबाॅर्नचे(Spaceborn) संस्थेचे संस्थापक एगबर्ट एडसब्राक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, हे स्पेस बेबीचं तंत्रज्ञान 2028 पर्यंत पूर्ण होईल. याच्यासोबत 2031 पर्यंत अंतराळात (in space) पहिल्या मानवी मूलाची प्रसूती (childbirth) होऊ शकते. या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञान आणि मानवाची निवड अगदी योग्यरित्या केली जाणार आहे. यापूर्वी हा प्रयोग उंदरावर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या