बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब करिअरची गजब कहाणी, लग्नात करवली बनून तरुणी कमावते लाखो रुपये!

नवी दिल्ली | लग्न म्हटलं की हल्ली सगळं एकदम परफेक्ट लागतं. यासाठी अगदी किरकोळ गोष्टींवर देखील लोक तुफान खर्च करतात. अशातच आता नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. लोक लग्नात चक्क करवली देखील पैसे देऊन निमंत्रित करत आहेत. हेच काम एक तरुणी करत असून ती यातून लाखो रुपये कमावते.

संबंधित तरुणी लग्नात वधूची करवली बनते आणि पाठवणी पर्यंत वधूच्यासोबत असते. या लग्नासाठी तिला वधूच्या बाजूने ड्रेस देखील दिला जातो. त्यामुळे तरुणीकडे इतके कपडे झालेत की, ती स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करु शकते, असं तिने सांगितलं आहे.

संबंधित तरुणीचं नाव जेन ग्लांट्स असं असून ती गेल्या सात वर्षांपासून हा करवली बनण्याचा व्यवसाय करते. तसेच यातून तिने लाखो रुपये कमावले आहेत. तिच्या या करिअरची संपुर्ण माहिती तिने सोशल मीडियावरुन दिली आहे.

दरम्यान, जेनकडे अनेक तरुणींनी याबद्दल ट्रेनिंग देण्याची मागणी केली आहे. तर जेनने ती जगातील पहिली पेड करवली अर्थात पेड ब्राईड्समेड असल्याचा दावा केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, रेव्ह पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघातून धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

प्रार्थनास्थळांचे दरवाजे उघडले पण ‘या’ लोकांना प्रवेश नाहीच; काय आहे नवी नियमावली?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More