बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यांच्यापेक्षा गिधाडं बरी! वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य

जालना | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यापेक्षा भयंकर म्हणजे काहीजण या काळातही गिधाडांपेक्षा भयानक वागत आहेत. जालना जिल्ह्यातील एका वॉर्डबॉयने मृताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याप्रमाणे कोरोनाने मृत्यु झालेल्या रुग्णासोबत केलं आहे.

जालन्यामधील एका शासकीय कोविड रूग्णालयात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वॉर्ड बॉयने मयत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरुन ‘फोन पे’ अॅपच्या माध्यमातून त्याच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यात जमा केले आहेत. पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी त्याने अशा प्रकारचं कृत्य केलं आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत.

कचरु पिंपराळे असं मृत कोरोनाबाधित रूग्णाचं नाव आहे. काही दिवसांपुर्वी कचरू यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला जालन्यातीस शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. पिंपराळे यांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी त्यांच्या खात्यातून काही पैसे ट्रान्सफर झाल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केल्यावर कचरु पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरुन फोनपे अॅपद्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचं घरच्यांना लक्षात आलं.

दरम्यान, कचरु यांचा मृत्यू पहाटे सहा वाजता झाला होता. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे कसे ट्रान्सफर झाले. हा प्रश्न कुटुंबीयांना पडला त्यानंतर त्यांना कळलं की पिंपराळे यांचा मोबाईल रुग्णालयातच राहिला होता.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून पतीने आपल्या पत्नीची प्रियकरासोबतच बांधली लगीनगाठ!

“लसींच्या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का आहेत?”

अबब! चक्क फुलपाखराचं ऑपरेशन; एकदा व्हिडीओ पाहाच  

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार ; मद्रास उच्च न्यायालयाचा संताप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More