बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु”

मुंबई |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने आज ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, या राजीनाम्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर अजून एक गंभीर आरोप केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की, नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले 100 कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ‘सीबीआय’ने तातडीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचे प्रकरण उघडकीस आल्यापासून राज्याचे गृहमंत्रालय विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा असलेला सहभाग आणि परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा केलेला आरोप यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले होते. याप्रकरणावरुन राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले होते.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या – 

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More