मुंबई | अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘रात अकेली है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कानपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणादरम्यान अनेकदा नवाजला काही चाहत्यांच्या अरेरावीला सामोर जावं लागत आहे.
याचदरम्यान नवाजच्या सुरक्षारक्षकाचा डोळा चुकवून एका चाहत्यानं थेट नवाजच्या गळ्यात हात घालून त्याला मागे खेचलं. नवाजसोबत त्यानं बळजबरीनं फोटो घेण्याचा प्रयत्न केला.
अनेक चाहते सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून सेटवर येत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी सेटवर जमत आहे. चित्रीकरणादरम्यान नवाजला काही चाहत्यांनी भर रस्त्यात घेरलं.
दरम्यान, ‘रात अकेली है’ चित्रपटात नवाज उत्तर प्रदेशमधल्या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. उत्तर प्रदेशमधल्या काही गावांत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन भारताच्या पाठिशी, उचलले महत्वाचे पाऊल
–विंग कमांडर अभिनंदनचे रक्ताळलेले फोटो दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारताने झापले!
-अभिनंदनला सुखरुप परत आणा; कुटुंबीयांचे भावनिक आवाहन
–खिशात दमडी नसताना पाकिस्तान करतंय युद्धाच्या वल्गणा!
-“भेटायला आला तर तो आमचा नाही तर भारतमातेचा”;शहीद पायलटच्या वडीलांची भावना
Comments are closed.