बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका

मुंबई | देशभरात जीएसटी कर लागू केल्यानंतर पाच वर्षांसाठी प्रत्येक राज्याला काही ठराविक रक्कम केेंद्र सरकारकडून देण्यात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणारी रक्कम आणखी दोन वर्षे देण्याची मागणी केली होती. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाची दोन वर्षे कठीण गेली असून पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्षांची वाढ करावी, अशी मागणी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.  तुम्ही आता राज्यचं केंद्राला चालवण्यासाठी द्या. 22 राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचं तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे आता सगळेच मागत असाल तर राज्यचं केंद्राला चालवण्यासाठी द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारने जीएसटी परिषदेला कर्ज दिलं. त्यानंतर जीएसटी परिषदेकडून राज्यांना थोडेथोडे पैसे देण्यात आले. जीएसटीचे पैसे रात्री 12 वाजताच केंद्राला आणि राज्यांना पाठवले जातात. लोकांना वेडे बनवण्याचं काम चालू आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी केंद्र सरकारकडे मागणी केल्याने चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.

दरम्यान,  महाराष्ट्रात जमा होणारा निम्मा जीएसटी केंद्राला जातो. त्याबद्दल मी अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला आहे. उद्या कॅबिनेट होण्याची शक्यता असून तिथे मी हा विषय मांडणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची संकट असतात त्यातून मार्ग काढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Corona Update: पुण्यात ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद, वाचा आजची आकडेवारी

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

शाळा बंद पण शिक्षण चालू! स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय अनोखा उपक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More