बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉसशी बोलला खोटं, प्रकरण झालं मोठं; सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं दिलं ‘हेे’ धक्कादायक कारण!

अमेरिका । कामावरून सुट्टी मिळावी यासाठी अनेकदा प्रत्येकजणं खोटी नाटी कारणे देत असतात. आजारी असणे, घरी आचानक पाहुणे येणे, घरात कोणाचा मृत्यू होणे अशी खोटी कारणे अनेक वेळा दिली जातात. मात्र या तरूणाने जे केलं हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. अमेरिकेतील एरिझोना मध्ये घडलेलं हे प्रकरण आहे.

ब्रँडन सुल्स नावाचा व्यक्ती एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. सुट्टी मिळावी म्हणून दोन व्यक्तींनी आपलं अपहरण केल्याचा दावा ब्रँडननं केला होता. दोन जणांनी आपल्याला बेशुद्ध करुन एका वाहनात नेलं आणि अज्ञात स्थळी फेकून दिलं, असा ब्रँडनचा दावा होता. हाताला पट्टा बांधलेल्या आणि तोंडात कापडाचा गोळा घातलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेलं त्याला एका व्यक्तीनं पाहिलं, असंही ब्रँडननं सांगितलं होतं.

त्याच्या या कारणावर कंपनीच्या मालकाला संशय आला. मालकाने याप्रकरणात पोलिसात तक्रार दाखलं केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तपास सुरु केल्या नंतर ब्रँडनचं अपहरण झालंच नव्हतं, त्यानं अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, आपलं अपहरण झालंच नव्हतं, तर सुट्टी मिळावी म्हणून यासाठी अपहरण झाल्याची खोटी माहिती दिल्याची कबुली ब्रँडननं दिली आहे. याप्रकरणात पोलिसांनी ब्रँडनला सक्त ताकिद देऊन सोडलं आहे. मात्र, याप्रकारानंतर ब्रँडनला आपलं काम गमवावं लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सलमानच्या ‘त्या’ एक्सगर्लफ्रेंडवर झाला होता बलात्कार, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे

“…तर भारतामुळे आशिया कप पुढं ढकलला जाईल”

संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं- उद्धव ठाकरे

…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More