बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जागतिक बँकेचा तालिबानला दणका! बँकेच्या ‘त्या’ निर्णयामुळे तालिबान्यांचं झालंय अवघड

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर 7 सप्टेंबरला तालिबानने नव्या काळजीवाहू सरकारची घोषणा केली. नवीन सरकार फक्त 6 महिने सत्तेत राहणार असल्याचं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर तालिबानच्या प्रमुख पदांवरून देखील हक्कानी नेटवर्क आणि तालिबानच्या गटांमध्ये संघर्ष झालेला दिसून आला. अशातच आता अफगाणिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे.

जागतिक बॅंकेने आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तालिबानची परदेशी मदत थांबवली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेेतील 9.4 अब्ज डॉलर्सचा साठा देखील थांबवला आहे. तर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने आपल्या 39 सदस्य राष्ट्रांना तालिबानची संपत्ती फ्रिज करण्यास सांगितलं आहे. यांसदर्भांत न्यूयॉर्क पोस्टने माहिती दिली.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर तालिबानच्या नव्या मंत्र्यांना आता देश कसा चालवयाचा, असा प्रश्न देखील पडला आहे. त्यामुळे तालिबानच्या समर्थकांना सध्या मोठ्या प्रमाणात पैशाची चणचण भासत आहेत. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यानं भविष्यात अफगाणिस्तानची 97 टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जाण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तवली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नव्या मंत्रिमंडळात महिलांना सामील करून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. अशातच तालिबानच्या प्रमुख पदावरून वाद झाल्यामुळे अफगाणिस्तानचा उपपंतप्रधान मुल्ला अब्दूल गनी बरादर काबूल सोडून पळून गेला आहे. त्यामुळे तालिबान सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस; ‘या’ प्रकरणामुळे रहावं लागणार हजर

‘या’ कंपनीला आले सोन्याचे दिवस, एका दिवसात विकल्या इतक्या कोटींच्या स्कूटर!

देशाला दिशा दाखवणारं क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रविण दरेकरांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून ‘प्रविणा मावशी’ नावाची उपमा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More