देश

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहे. जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनी देखील या कायद्यांवर टीका केली आहे.

जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी या कायद्यांचा अभ्यास करुन हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे असल्याचं म्हटलंय.

भारतात कृषी क्षेत्रात मोठ्या बदलांची गरज आहे. मात्र हे कायदे त्यासाठी उपयोगाचे नाही, असं कौशिक बासू यांनी म्हटलं. तसेच त्यांनी यावेळी या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे. मी भारतातील नव्या कृषी कायद्यांचा अभ्यास केला. अभ्यासानंतर हे कायदे सदोष असल्याचं आणि शेतकऱ्यांसाठी हानिकारक असल्याचं लक्षात आलं, असं कौशिक बासू यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याआधी कॅनडानेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या