बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

मुंबई | क्रिकेटचा कुंभमेळावा समजला जाणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यांना आता सुरूवात झाली आहे. सध्या पात्र फेरीतील सामने रंगतदार स्थितीत आहेत. तर दुसरीकडे आधीच पात्र झालेले संघ आता सराव सामने खेळताना दिसत आहे. अशातच आता गतविजेता वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो म्हणजेच डीजे ब्रावो यांच्या एक नवीन गाण्याची झलक आता समोर आली आहे. ड्वेन ब्रावोने त्याच्या वर्ल्ड चॅम्पियन गाण्याचा टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 25 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अनेक कॅरेबियन खेळाडू नाचताना दिसत आहे. या गाण्यात युनिव्हर्सल बाॅस ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, फॅबियन एलेन तसेच सुनिल नरेन देखील नाचताना दिसत आहे.

मरून संघासाठी आम्ही हे गाणं तयार केलंय. तुम्ही सर्वजण या गाण्याचा आनंद घ्या आणि आमच्या संघाला सपोर्ट करा, असं ड्वेन ब्रावोने या गाण्याचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे. हे गाणं आता लवकरच समोर येणार असल्याचं देखील त्याने यावेळेस सांगितलं आहे.

दरम्यान, 1 लाख 75 हजारहून अधिक नेटकऱ्यांनी हा टीझर पाहिला आहे. वेस्ट इंडिज संघ टी ट्वेंटी विश्वचषकाचा गतविजेता संघ आहे. 2016 मध्ये रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला होता. आता पुन्हा वेस्ट इंडिजचा संघ पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More