बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…

नवी दिल्ली | जागतिक दर्जाचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर सडकून टीका केली आहे. ते राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्राय डे फ्लेम’ या कार्यक्रमात बोलत होते.

कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागल्यामुळे देशातील सामान्य माणसांचे प्रचंड हाल झाले. या काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार या नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही देऊ शकलं नाही, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलंय.

कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोई नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानानी लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं, पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधनं नाहीत याकडे दुर्लक्ष केलं, असं त्यांनी सांगितलं.

आधीच नोट बंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली, अशी टीका अमर्त्य सेन यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

ह्रदयद्रावक! कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसालकौतुकास्पद! पुण्यात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More