Top News देश

जगभरात कोरोनाचा हाहाकार, तब्बल 30 लाख लोकांना कोरोनाची लागण तर 2 लाख मृत्यू!

नवी दिल्ली | जगातल्या 210 देशात कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित लोकांची संख्या 30 लाखांवर जाऊन पोहचली आहे. तर कोरोनाने तब्बल 2 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत, अमेरिका, स्पेन, इटली, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात कोरोनाचे हजारो रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आजपर्यंत 30 लाख 64 हजार 225 एवढा झाला आहे. तर दोन लाख 11 हजार 537 लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत 9 लाख 22 हजार 387 लोक कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यातून बरे झाले आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 32 टक्के रूग्ण आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 लाख 10 हजार 356 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 56 हजार 797 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान,देशातील रुग्णांचा आकडा आता 28 हजार पार गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

माणुसकी मेली?; पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही

हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?

“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या