बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्डकप चॅम्पियन ‘यशपाल शर्मा’ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

नवी दिल्ली | 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. तो भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण होता. हा 1983 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन झालं आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्यानं शर्मा यांचं निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. त्याच्या जाण्यानं क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

यशपाल शर्मा हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर त्यांनी भारतासाठी अनेक सामने जिंकवले आहेत. 1983 च्या विश्वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 61 धावांची खेळी केल्यानं भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता.

यशपाल शर्मा यांनी 1978 मध्ये भारतीय क्रिकेट संघात वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 1979 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यशपाल यांनी 37 टेस्टमध्ये 1606 धावा केल्या होत्या ज्यात दोन शतकांचा समावेश होता. तर 42 वनडेमध्ये 883 धावा केल्या. ते केवळ 6 वर्ष भारतीय संघात होते. परंतू या 6 वर्षात त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिलं आहे. विश्वचषकमध्ये वेस्ट इंडीज विरोधातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 89 धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर त्यांचं नाव जागतिक पातळीवर घेतलं जाऊ लागलं.

दरम्यान, यशपाल शर्मा 2005 मध्ये टीम इंडियाचे राष्ट्रीय निवडकर्ते देखील राहिले होते. त्यानंतर देखील यशपाल शर्मा 2008 मध्ये पुन्हा निवडकर्ते म्हणून भारतीय संघाशी जोडले गेले होते. त्यानंतर त्यांनी क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काही काळ काम केलं. एका वृत्तवाहिनीवर त्यांनी क्रिकेट एक्सपर्ट म्हणून काम केलं. त्याच्या परखड विश्लेषणासाठी देखील त्यांची एक वेगळीच ओळख होती.

थोडक्यात बातम्या-

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 118 दिवसातील निच्चांकी नोंद

भारतात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ तारखेपासूनच सुरू झाली, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा!

‘कोरोना लसीचे डोस मिक्स घेऊ नका’ ; WHO चा गंभीर इशारा

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलिस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More