World Food Day! महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ तुम्हाला माहितेय का?

World Food Day | आज 16 ऑक्टोबररोजी ‘जागतिक अन्न दिन’ साजरा केला जातोय. या वर्षी अन्न दिनाची थीम आहे ‘चांगल्या जीवनासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी खाद्यपदार्थांचा अधिकार’.संपूर्ण जगभरात हा दिन साजरा केला जातो. आपल्याकडे ‘आरोग्य हीच खरी धनसंपत्ती’ असं म्हटलं जातं. चांगले आरोग्य असणे, ही मोठी संपत्ती आहे. सध्याच्या युगात आरोग्याच्या अनेक समस्या अगदी लहान वयातच निर्माण होतात. कामाचा ताण, अपुरी झोप यासोबतच इतर काही गोष्टीमुळे जेवणाच्या वेळा बदलतात. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे आरोग्य जपायचे असेल तर आपला आहार हा सात्विक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज जागतिक अन्न दिनानिमित्त आपण महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध खाद्य पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. (World Food Day)

मसालेदार आणि तिखट चवीसाठी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ ओळखले जातात. महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, कोकणी ठेचा, खर्डा, शेंगदाण्याची चटणी यांसारखे अप्रतिम पदार्थ प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध खाद्य पदार्थ-

पुरणपोळी : कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी जवळपास प्रत्येक सणा-वाराला महाराष्ट्रात बनवली जाते.

मिसळ पाव : मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ आहे. यात कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ असे प्रकार देखील आहेत. (World Food Day)

वडा पाव : मुंबई आणि वडापाव हे जणू एक समीकरणच आहे. मुंबईचा वडापाव हा जगप्रसिद्ध खाद्य पदार्थ आहे. उकडलेल्या बटाट्याचे सारण व बेसनाचे कवच एकत्र तळून बटाटावडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लवकर तयार होणारा पदार्थ आहे.

मोदक : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मोदक हा पदार्थ हमखास बनवला जातो. याचे गोड आणि तिखट असे दोन प्रकार असतात. नेहमीचे उकडीचे,तळणीचे, सारणाचे गोड मोदक अधिक बनवले जातात.

थालीपीठ : महाराष्ट्रातील लोक हा पदार्थ मोठ्या आवडीने खातात. ते आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. थालीपीठ बनवण्यासाठी डाळ आणि पीठ वापरले जाते. थालीपीठ बनवण्याची पद्धत देखील अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे. याला महाराष्ट्रातील लोक खूप आवडीने खातात. (World Food Day)

कांदा पोहे : महाराष्ट्रात कांदा पोहा हा एक प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहे. नागपुरी पोहे देखील प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे

संत्री – नागपूर, अमरावती
द्राक्षे – नाशिक, सांगली
चिकू – घोलवड, डहाणू, ठाणे
सिताफळ – दौलताबाद (औंरगाबाद)
केळी – जळगाव, वसई
अंजीर – राजेवाडी (पुणे)
हापूस आंबा – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मोसंबी – औरंगाबाद, जालना, श्रीरामपूर (World Food Day)

News Title :  World Food Day Maharashtra Famous food

महत्वाच्या बातम्या-

माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!

अजितदादांना मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 600 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

विधानसभेपूर्वी रुपाली चाकणकरांची मोठी खेळी!

आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी