बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाउन हटवण्याची घाई केली तर…; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मुंबई | लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील, असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

युरोपात करोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाउनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. स्पेनमध्ये बांधकाम तसंच फॅक्टरी प्रोडक्शन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचार केला जात आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ट्रम्प यांनी मोदींना दम दिला, मोदींनी त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं- पृथ्वीराज चव्हाण

राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण; तिघांचा गेला बळी

“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”

भारत सरकारने जीडीपीच्या 100 टक्के कर्ज काढावं; पृथ्वीबाबांच्या कोरोना संकटात महत्त्वाच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More