बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

भारतात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढू लागलाय. कोरोना बाधीत रूग्णांचा आकडाही ४ लाखांच्या घरात जाऊन पोहचला आहे. लाॅकडाऊनच्या कठिण काळातून देश नव्यानं उभारी घेतोय. जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचा नवा इशारा हा जनतेच्या चिंतेत वाढ करणारा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आशिया, दक्षिण अमेरिका व मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचं थैमान अद्याप कायम राहणार आहे. कोरोना बाधीतांच्या संख्येत दर दिवशी लाखाहून जास्त रूग्णांची भर पडत आहे. दोन आठवडे अशीच परिस्थिती कायम राहील, असा गंभीर इशारा आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडराॅस एडहोम यांच्या मते, चीन देशातून सुरू झालेला कोरोनाचा कहर जगभर पसरला. दरम्यान चीननं व्हायरस संक्रमणावर बरीचशी पकड मिळवली होती. मात्र ५० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर आता चीनची परिस्थिती पुन्हा गंभीर झाल्याचं पहायला मिळत आहे

.

चीनच्या कोरोना संक्रमणाच्या आकडेवारीत पुन्हा वेगानं वाढ होऊ लागलीय. बिजींगमध्ये नव्याने कोरोना विषाणूच्या ९० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. पाठीशी अनुभव असल्यानं चीन सध्या ही परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहे. चीनला आर्थिक मदतीची गरज भासल्यास आरोग्य संघटनेचं पथक चीनची पाहणी करून येईल असंही टेडराॅस यांनी सांगितलं.

आफ्रिकेतील देशांना मात्र या व्हायरसचा गंभीर फटका सहन करावा लागत आहे. आफ्रिकन देशात या कोरोनाचा वेगानं प्रादुर्भाव होत आहे. परिस्थिती दिवसागणिक बिकट बनत चालली आहे. यापुढील दोन आठवड्यात या देशांत कोरोनाचं संक्रमण वेगानं होईल, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलाय.

 

भारतात दर दिवशी ३० ते ५० हजार कोरोना बाधीत रूग्ण वाढत असण्याची दाट शक्यता आहे. मात्र भारत केवळ १० हजारांच्या आसपास रूग्णांना शोधण्यात यशस्वी होत आहे. याचाच अर्थ उर्वरित रूग्णांचा समाजात वावर चालू आहे. या रूग्णांपाहून कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. या चिंतेच्या वातावरणातच आरोग्य संघटनेचा इशारा महत्वाचा ठरणार आहे.

कोरोनाला थोपविण्यात भारताला काही प्रमाणात यश मिळालं आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांच्या आकड्यातही वाढ होत आहे. भारताची परिस्थिती दिलासादायक असली तरी कोरोना बाधितांची संख्या आजही नियंत्रणात नाही . कोरोना संक्रमित रूग्णांचा आलेख वेगानं वाढतच आहे. आजमितीस कोरोना बाधीतांचा आकडा तब्बल ३,४३,०९१ एवढा असून साडेचार हजार नागरिकांचा या विषाणूमुळे बळी गेला आहे.

भारतातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आलाय. आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी लोकांना बाहेर पडणं गरजेचं वाटत आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दीही वाढली आहे. सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन राजरोसपणे सुरूच आहे. या परिस्थितीचा विचार करता जागतिक आरोग्य संघटनेचा हा इशारा गांभिर्याने घेणं गरजेचा आहे. अन्यथा पुढील दोन आठवड्यात कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात आणणं जिकीरीचं बनेल एवढं मात्र नक्की.

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More