बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जागतिक आरोग्य संघटनेचा दिलाय हा इशारा; जग आता मोठ्या संकटात!

कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. जगभरातील कोरोना संक्रमितांचा आकडा ९० लाखांच्या घरात जाऊन पोहचला आहे. बाधीत रूग्णांची ही आकडेवारी नक्कीच छातीत धडकी भरवणारी आहे. या तणावाच्या काळातच जागतिक आरोग्य संघटनेकडून आता नव्या संकटाचा इशारा देण्यात आलाय.

कोरोना व्हायरसचं संक्रमण देशानुसार सध्या कमी जास्त वाटत असलं. तरी जागतिक पातळीवर कोरोनाबाधीतांच्या संख्येत धोकादायक वाढ झाली आहे. जग आता नव्या संकटाच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे, असा इशाराच जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलाय.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडराॅस एडहोम यांच्या मते, कोरोना व्हायरसचं संक्रमण सध्या वेगानं वाढत आहे. लाॅकडाऊनच्या मोठ्या कालावधीनंतर आता बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय अनेक देशांना नाईलाजास्तव घ्यावा लागणार आहे. मात्र यादरम्यान कोरोना बाधितांचा फार मोठा आकडा समोर येऊ शकतो. असा इशाराच संघटनेकडून सर्व देशांना देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, लाॅकडाऊन खुला झाल्यावर सरकार व आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण येऊ शकतो. गुरूवारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात कोरोनाचे तब्बल दीड लाख रूग्ण आढळून आले असून, एका दिवसात सापडलेल्या रूग्णांचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल.

प्रामुख्याने अमेरिका, ब्राझील व लॅटिन अमेरिका या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . तसेच मध्य पूर्व व दक्षीण आशियाई भागात कोरोना संक्रमणाची वाढ चिंताजनक असल्याचं आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना वाढीचा वेग असाच राहिला तर या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच देशांना तारेवरची कसरत करावी लागू शकते.

कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणं या गोष्टींना फार महत्व असल्याचं आरोग्य संघटनेकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलं. स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून याविषयी जनजागृती केली जात असली तरी या गोष्टींचं तंतोतंत पालन करण्यात अद्याप अडचणी येत आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणूच्या घडामोंडीवर बारीक नजर ठेवली जात आहे. कोरोना संबंधी नवनवीन संशोधन करणं, विषाणूवरील लस व औषधांच्या चाचण्या घेणं व कोरोना संक्रमित देशांना सजग करणं अशा व्यापक स्वरूपात सध्या संघटना काम करत आहे.

भारतातही लाॅकडाऊन शिथील करण्यात आला आहे. जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोना संक्रमितांचा आलेखही वेगानं वाढू लागलाय. मुंबई शहर तर कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट बनलं आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता आरोग्य संघटनेचा हा इशारा गांभिर्याने घेणं महत्वाचं आहे. अन्यथा देशाला पुन्हा एकदा लाॅकडाऊनला सामोरं जावं लागेल यात शंकाच नाही.

ट्रेंडिंग स्टोरीज-

3 वर्षे कॉलिंगसाठी साधा मोबाईल वापरला; अडीच वर्षात क्रॅक केल्या 4 स्पर्धा परीक्षा!

आई-बाप दगड फोडायचे; मात्र बेलदाराचं पोर झालं डीवायएसपी!

श्रीगोंद्याच्या २ भावांची कमाल… एकाची उपजिल्हाधिकारी तर दुसऱ्याची नायब तहसिलदारपदी निवड!

बापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं!

वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

जिद्दीला सलाम! शेतकऱ्याची लेक बनली तहसीलदार तर जावई सीमेवर करतोय देश सेवा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More