बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार

कीव | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. रशियाने युक्रेनवर अनेक मिसाईल हल्ले केले आहेत. युक्रेन नाटोचा सदस्य होण्याची शक्यता हे दोन्ही देशातील तणावाचं मुख्य कारण मानलं जात आहे. त्यातच आता युक्रेन नाटो सीमेजवळ रशिया आणि नाटो सैन्यांमध्ये चकमक होण्याची दाट शक्यता आहे.

13 मार्चला रशियन विमानानं आंतराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा केंद्रावर रॉकेट हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर संघर्ष वाढण्याची शक्यता होती. मात्र, नाटोने अखेरपर्यंत युक्रेनला मदत केली नाही. त्यावरून जगभरातून अनेक देशांनी नाटोवर टीका देखील केली आहे. नाटोचे सदस्यत्व एखाद्या सदस्य राष्ट्राला उत्तर अटलांटिक कराराच्या अनुच्छेद 5 नुसार इतर सदस्यांकडून पाठिंबा मिळवण्याची परवानगी देतं.

11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्क आणि वॉशिग्टनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने हा अनुच्छेद वापरला होता. मात्र, इतर सर्व नाटो देश हे हल्ला रोखण्यासाठी सदस्य देशात सैन्य पाठवतील, अशी हमी अनुच्छेद पाच देत नाही. त्यामुळे युक्रेनने यावर नाराजी व्यक्त केली होती. नाटोच्या या निर्णयामुळे आता युक्रेन आणि रशिया युद्धात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे.

दरम्यान, एखाद्या शांत किंवा तणावपुर्ण सीमेवर गोळीबार करणे, एखाद्या कनिष्ठ नॉन कमिशन्ड अधिकाऱ्याने निर्माण झालेल्या परिस्थितीला चुकीचं ठरवून आक्रमण केल्यास युद्ध ओढवण्याची भीती असते. युक्रेनला निषिद्ध विमानचालन क्षेत्र घोषित करण्यासाठी नाटोला वारंवार आवाहन केलं आहे. मात्र, नाटोच्या या नेत्यांनी रशिया आणि नाटो सैन्यांमधील लष्करी संघर्ष निर्माण होण्याचा निष्कर्ष काढला आहे.

थोडक्यात बातम्या-

Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

“… तर भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल”

शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेली ‘ती’ इमारत रशियाकडून उद्ध्वस्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More