भारताचे विश्वचषक विजेते खेळाडू मालामाल, बक्षिसांची घोषणा

नवी दिल्ली | विश्वचषक विजेत्या भारताच्या युवा संघातील खेळाडू मालामाल झाले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या कामगिरीवर खूश होत त्यांना रोख रकमेच्या बक्षिसांची घोषणा केलीय. 

विश्वविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 20 लाख रुपयांचा इनाम देण्यात येणार आहे. दुसरीकडे प्रशिक्षण राहुल द्रविडसाठीही रोख बक्षिसाची घोषणा करण्यात आलीय. राहुल द्रविडला 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याच्या मेहनतीची बीसीसीआयनं दखल घेतल्याचं दिसतंय. 

दरम्यान, ही तर सुरुवात आहे. भारताच्या यंग ब्रिगेडवर आणखी बक्षिसांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे.