महिंद्राची धमाकेदार इलेक्ट्रीक कार लाँच; 1.86 सेकंदात पकडणार इतक्या किमीचा वेग

नवी दिल्ली | हल्ली सगळीकडे जबरदस्त कारची (Car) क्रेझ आहे. ई-कारमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा पहायला मिळत आहे. नवनवीन ई-कार बाजारात उपलब्ध होत आहेत. अशातच नुकताच जगातील सर्वात वेगवान कारचं लाॅन्चिंग झालं आहे. अनेक जबरदस्त फिचर्ससह ही कार उपलब्ध झाली आहे.

हैदराबाद (Hyderabad) येथे सुरु असलेल्या ई-मोटार शोमध्ये इलेक्ट्रिक हायपर जीटी बटिस्टा सादर करण्यात आली. ही कार जगातील सर्वत वेगवान धावणारी इलेक्ट्रिक कार (Electric car) आहे. ही कार 0 ते 100 Kmph चं अतंर पार करण्यासाठी 1.86 सेकंदाचा वेळ लागतो. हा अधिकृत रेकाॅर्ड आहे.

ही कार महिंद्रा अॅन्ड महिंद्राच्या (Mahindra and Mahindra) मालकीची कंपनी इटालियन लक्झरी कार ब्रँड ऑटोमोबिली पिनिनफेरिना (Automobili Pininfarina) या कंपनीनं डिझाइन केली आहे. 11 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारतातील पहिल्या-वहिल्या ग्रँड प्रिक्स स्पर्धेत ही इलेक्ट्रिक कार सहभागी होणार आहे. या कारमध्ये चारही चाकांना स्वतंत्र असे मोटर्स असणार आहेत. कारचा टाॅप स्पीड 350 Kmph आहे

बॅटिस्टा (Batista) पाच वेगवेगळ्या ड्राइव्ह मोडमध्ये उपलब्ध असणार आहे. बॅटिस्टा, रीमेक नेवरा, टेस्ला रोडस्टर (Tesla Roadster), लोटस एविजा(Lotus Avija), टेस्ला माॅडल-S या पाच ड्राइव्हमध्ये उपलब्ध असेल. हायपर जीटी बॅटिस्टाची सगळी बाॅडी चेसिस कार्बन फायबरपासून (carbon of the fiber) बनवण्यात आली आहे. कारची सुरुवातीची किंमत 19.45 कोटी आहे.

महत्त्वाच्या बातम्या