वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले

Worli Hit And Run Accident | मुंबईत हिट अँड रनप्रकरण (Worli Hit And Run Accident) समोर आलं आहे. वरळी सी लिंक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील अत्तर व्यवसायिकाचा मुलगा किरण इंदुलकर हा गाडी चालवत होता. त्याने एका दुचाकी चालवणाऱ्या तरूणाला आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणाचे विनोद लाड (28 वर्षे) असं नाव आहे. (Worli Hit And Run Accident)

वरळीत पुन्हा हिट अँड रनप्रकरण

मुंबईतील वरळी येथील परिसरात शनिवारी 20 जुलै रोजी एक भीषण अपघात घडला. वांद्रे वरळी सी लिंक जवळ असलेल्या अब्दुल गफार खान मार्गावर  बीएमडब्ल्यू कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत विनोद लाड जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो कोमात गेला. विनोदवर नायर रूग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. (Worli Hit And Run Accident)

बीएमडब्ल्यू  कारच्या धडकेत जखमी झालेल्या विनोद लाड या तरूणाचा सात दिवसानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी आता कार चालक किरण इंदुलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. बीएमडब्लू गाडी ठाण्यातील प्रसिद्ध अत्तर व्यवसायिकाची आहे. (Worli Hit And Run Accident)

विनोद लाड हा मूळ मालवणमधील रहिवाशी होता. तो ठाण्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. तो आपल्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी ठाण्यातून वरळीत आला होता. विनोदचा भाऊ किशोर लाडने पोलिसात तक्रार दाखल केली. या अपघातावेळी किरण इंदुलकर गाडी चालवत असल्याचं तक्रारीत दाखल करण्यात आलं आहे.

वरळीत हिट अँड रनची दुसरी घटना

दरम्यान काही दिवसांआधी 9 जुलै रोजी मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यूने धडक दिली. या धडकेत नाखवा परिवाराला मोठा धक्का बसला होता. नाखवा दाम्पत्याला उडवले गेले. त्यानंतर जखमी झालेल्या कावेरी नाखवा यांना गाडीने काही अंतरापर्यंत फरफटत नेलं होतं. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती देखील जखमी झाले होते.

News Title – Worli Hit And Run Accident BMW Car Hit Young Man

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या सभेत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’; शपथविधीवेळी भावना गवळी यांची घोषणा

Manu Bhaker ची ऐतिहासिक कामगिरी; कांस्य पदकावर कोरलं नाव

यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरणमध्ये संतापाची लाट

हवामान खात्याचा मोठा इशारा, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे