Worli Hit And Run | रविवारी 7 जुलैरोजी मुंबईत पहाटेच एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेल्याची घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते असून त्यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah)हा या अपघातानंतर फरार होता.
अखेर मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. विशेष (Worli Hit And Run) म्हणजे या 12 जणांमध्ये मिहिर शाह याची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे.
मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, या 12 जणांनी मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केल्याचं समोर आलंय. तसंच पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं. पण, आज कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
यानंतर मिहिर शाहाला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. मिहीर शाहने अपघातावेळी मद्यपान केलं होतं का, अपघातावेळी नेमकं काय घडलं याबद्दल आता पोलिस (Worli Hit And Run) तपास करतील.
“तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू”
पोलिसांनी यापूर्वी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे. तसंच मिहीर शाहाने (Worli Hit And Run)अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर ‘तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू’ असा सल्लाही त्यांनी दिला असल्याचं आता समोर आलंय.
या प्रकरणी आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. आजच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. “या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मला असं कळालंय की, त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत.”, असं राऊत म्हणाले होते.
News Title – Worli Hit And Run latest update
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
खरेदीची करा घाई! Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर मिळतंय तगडं डिस्काऊंट
“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत
“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, शेतकरी नेत्याची सरकारवर टीका
“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं