वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

Worli Hit And Run | राज्यात पुणे अपघातानंतर वरळी अपघात प्रकरण चर्चेत आलं आहे. रविवारी 7 जुलैरोजी मुंबईत पहाटेच एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेल्याची घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह  (Rajesh Shah) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राजेश शाह हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते असून त्यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah)याला या अपघात प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अशात राजेश शाह यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वरळी हिट अँड रन (Worli Hit And Run) अपघातानंतर राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना शिंदे गटात राजेश शाह शिवसेना उपनेते पदावर होते. त्यांचा मुलगा मिहीर शाह यानं भरधाव गाडीनं वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर शिंदे गटाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती आहे.

कालच मुंबई पोलिसांनी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली. विशेष (Worli Hit And Run) म्हणजे या 12 जणांमध्ये मिहिर शाह याची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे.

आरोपी मिहीर शाहची मोठी कबुली

मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखाकडून त्याची आई, दोन बहिणी आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आला. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शाहनं यावेळी दिली. तसेच यात मिहीरच्या बहिणीने घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भितीनं आम्ही घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं. पण,कालच कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तसंच मिहीर शाहाने (Worli Hit And Run)अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर ‘तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू’ असा सल्लाही त्यांनी दिला असल्याचं आता समोर आलंय. या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा रंगली आहे. या प्रकरणी नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय.

News Title – Worli Hit And Run Rajesh Shah expelled from Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या-

“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!

अंबानींच्या कार्यक्रमात खाण्याच्या पदार्थात आढळलं असं काही, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”

आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन्स होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय