बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतोय कोरोना संसर्ग

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. तोच तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं संकट टळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाविषयी आणखी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसून येत आहे की, ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले त्यांचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह येत आहे. यामुळे अनेक लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेनं अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट हे कोरोना विषाणूचं बदललेलं रूप आहे. हे रुप राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोना लसीकरण केल्यावर मृत्युचं प्रमाणही कमी होत असल्याचं दिसून येत आहे आणि संसर्ग होण्याचा धोकाही कमी वर्तवला जात आहे. त्यामुळे लोकांना लसीकरण करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे

खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार?, राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

केबीसीमध्ये लखपती झालेल्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यु

राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More