बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक: महाराष्ट्र राज्य ठरतंय Omicronचं हाॅटस्पाॅट

नवी दिल्ली | कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं चिंतेत भर पाडली असतानाच ओमिक्राॅन व्हेरिएंटनं (Omicron Varriant) डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दिवसागणिक ओमिक्राॅन बाधित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्र राज्य हे ओमिक्राॅनचं हाॅटस्पाॅट ठरत असल्याचं चित्र आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्राॅननं (Omicron) तर चिंतेत आणखी भर पाडली आहे. रोज कुठेना कुठे ओमिक्राॅनचा रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ओमिक्राॅनची बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 88 वर पोहोचली.

राज्यानुसार महाराष्ट्रात 32, राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, केरळमध्ये 5, गुजरातमध्ये 5, तर आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये 1-1 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यातील रुग्णांची ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य ओमिक्राॅन व्हेरिएंटचं हाॅटस्पाॅट ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.

थोडक्यात बातम्या – 

येत्या 3-4 दिवसांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

जेवणाच्या पंगतीत राज ठाकरे खुर्चीवर अन् कार्यकर्ते जमिनीवर; मनसेनं सांगितलं कारण

‘पाॅर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्धवस्त झाले’; प्रसिद्ध राॅकस्टारचा धक्कादायक खुलासा

“सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची वाट लावली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More