बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

नवी दिल्ली | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चिंतेत आणखी भर पाडली आहे. लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनचा वाढता धोका पाहता काही ठिकाणी लाॅकडानही (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे.

ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. रुग्णांमधयेही वाढ होत आहे. कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. अशातच आता ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक राज्यांनी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या (New Year celebration) टाळण्यास सांगितले आहे.

आम्ही नवीन वर्षाच्या सार्वजनिक उत्सवावर बंदी घातली आहे. तसेच 50 टक्के आसन क्षमता असलेल्या क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये डीजेसारख्या विशेष कार्यक्रमांशिवाय मेळाव्यास परवानगी आहे. या काळात संपूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. हे निर्बंध 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लागू असतील, असा निर्णय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हेरिएंटचं नाव ओमिक्राॅन असून यानं देशभरात खळबळ माजवायला सुरुवात केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More