Top News महाराष्ट्र मुंबई

वाह अजित दादा वाह, लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा- निलेश राणे

मुंबई | नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजचा जोरदार समाचार घेतला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.

वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. तर पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

 

महत्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

“एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या