बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

नवी दिल्ली | इंजेक्शन म्हटलं की अनेकांना सुईची भीती वाटते. यामुळे कित्येक लोक इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता लवकरच सुईशिवाय इंजेक्शन घेता येणार आहे. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठानं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान आता एका निर्णायक टप्प्यावर येवून पोहोचलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक छोटी थ्रीडी प्रिंटेड मायक्रोडेनल लस शोधली आहे. ही लस भविष्यात सुईला पर्याय म्हणून वापरली जाईल. याचा प्रभाव इंजेक्शनपेक्षा अधिक आणि जलद असेल.

शास्त्रज्ञांनी काही उंदरांवर या तंत्रज्ञानाची चाचणी केली आहे. या चाचणीमध्ये उंदरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर दिसून आलेला प्रभाव इंजेक्शनच्या तुलनेत 10 पटीने अधिक आहे. तसेच टीसी अॅंटीजन स्पेसिफीक अॅंटीबॉडीजच्या बाबतीत हा प्रभाव 50 पटीने अधिक आढळून आला आहे. सुईची भीती असणाऱ्या लोकांसाठी हे तंत्रज्ञान मोलाचं ठरणार आहे.

दरम्यान, थ्रीडी प्रिंटेड मायक्रोडेनल लस घेण्यासाठी नर्स किंवा डॉक्टरांची देखील गरज नाही. गरज असेल तेव्हा कोणीही व्यक्ती ही लस घेवू शकतो. ही लस एका लहानश्या पॅचच्या स्वरुपात आहे. यामुळे होणाऱ्या वेदना या अगदी नगन्य असतील.

थोडक्यात बातम्या –

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

शिवभोजन थाळी आता मोफत नाही, 1 ऑक्टोबरपासून ‘इतक्या’ रुपयांना मिळणार थाळी!

पांड्या इज बॅक! सलग तीन पराभवानंतर मुंबईची गाडी विजयी पथावर, पाहा व्हिडीओ

भावा तूच रे! कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीमागे हिटमॅन रोहितचाही हात, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More