बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह! क्या बात है ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, पाहा व्हिडीओ

मुंबई | भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या सध्या मुंबईत आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे. तो अनेकदा त्याची पत्नी पंखुरी शर्मासोबत रोमँटिक फोटो सोशल मीडीयावर शेअर करत असतो. आता या जोडीचा एक नवीन व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तो पंखुरी शर्मासोबत ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे-कजरा रे’ या गाण्यावर थिरकतांना दिसत आहेत.

कृणाल पंड्या आणि पंखुरी शर्मा यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवत असून. त्याचे चाहते या व्हिडीओला लाईक आणि शेअरदेखील करत आहेत. विशेष म्हणजे हे गाणे बाॅलिवूडमधिल प्रसिद्ध गायिका अलिशा चिनाॅय यांनी गायले आहे. तर अणिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रित केले गेले होते. कृणाल पंड्या नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्राॅफी 2021 मध्ये खेळला आहे

पूर्ण हंगामात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने 388 धावा ठोकल्या आहेत. त्यात त्याचे 2 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. याबरोबरच त्याने 5 खेळाडूंना बाद केले होते. त्याच्या विजय हजारे ट्राॅफीतील आणि आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमधील कामगिरीला पाहता त्याला इंग्लंविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली आहे. 23 मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, कृणालने 2018 साली वेस्ट इंडिजविरिद्ध टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने 18 टी-20 सामने खेळताना त्याने 14 खेळाडू बाद केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

सोने विक्रीबाबत सरकारचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढला, महाराष्ट्र नंतर ‘या’ राज्याने लागू केले कठोर निर्बंध

‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं

राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More