महाराष्ट्र मुंबई

“तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीनं केली आत्महत्या!

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या लेखकांपैकी एक अभिषेक मकवाना याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी अभिषेक मकवाना याने सुसाईड नोट लिहिली आहे. आर्थिक समस्यांना वैतागून आत्महत्या करत असल्याचं अभिषेकने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. अभिषेकने मृत्यूपूर्वी लिहिलेली सूसाईड नोट गुजरातीत आहे.

मी परिस्थितीशी लढण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण मी अपयशी ठरलो. आता मी हरलो आहे, असं अभिषेकने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. तसेच त्यांने कुटुंबाची माफी मागितली आहे.

गेल्या 27 नोव्हेंबरला अभिषेकचा मृतदेह त्याच्या कांदीवलीस्थित फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची केस दाखल केली आहे.

अभिषेक सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंग बळी ठरल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अभिषेकच्या मृत्यूनंतरही त्याला सतत फोन येत आहेत, असं अभिषेकच्या कुटुंबीयांनी संगितलं.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!

4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन!

भाजपचा पराभव झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणतात; “वाईट सुरुवात…”

उर्मिला मातोंडकरांचा आनंद गगनात मावेना; पाहा काय केलंय ट्विट!

कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या