पुणे | पिंपरीतील साई चाैक आणि शगुन चौकात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी महिला पोलीस स्वाती सीताराम सोन्नर यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र संबंधित महिला पोलिसाने आपला लाच घेतली नसल्याचं सांगितलं आहे.
स्वाती सीताराम सोन्नर यांना निलंबित करण्यात आलं आहे. स्वाती यांनी आपल्या वरिष्ठांकडे या प्रकरणासंदर्भात लेखी खुलासा दिला आहे. पैसे देणारी महिला ही माझ्या ओळखीची असून त्यांनी वस्तू खरेदी केली होती त्याचे पैसे मी दिले होते. त्यांनी ते त्या दिवशी परत दिले, असल्याचं सोन्नर यांनी सांगितलं आहे.
महिला पोलीस कर्मचारी या वाहतूक पोलीस अधिकारी जवळ असताना त्यांची नजर चुकवून लाच घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, वळच्याच एका इमारतीमधून कोणीतरी हा सर्वप्रकार मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
@PuneCityPolice @PuneCityTraffic
Is this the way you are going to deal the crime?? Take some serious action against this Lady police. It’s on Sai Chowk #Pune #PunePolice #Corona #Bribe #Corruption #CorruptPolice #Shame pic.twitter.com/3Q03ELzvKB— parth v kaweeshwar (@parthvkavishwar) December 16, 2020
थोडक्यात बातम्या-
“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”
भाजपचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शिवसेना सोबत नसल्याने आमचं नुकसान पण…- चंद्रकांत पाटील
OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला
उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ