राम कदमांनी डोकेदुखी वाढवून घेतली; सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्वीट

मुंबई | आधीच वादात अडकलेले आमदार राम कदम यांनी केलेल्या एका ट्वीटवरून पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. विदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेंच्या निधनाचं ट्वीट कदमांनी केलं आहे. 

हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाची बेंद्रे पडद्याआड, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

दरम्यान, चुक लक्षात आल्यावर मात्र त्यांनी ते ट्वीट डिलीट करत नवीन ट्वीट केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पाहायला मिळत आहेत, मी त्यांच्या हितासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.