बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (IndVsNz) सध्या कसोटी मालिका (Test Match) चालू आहे. दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जातोय. पण पहिल्याच दिवशीचा खेळ वादात सापडला आहे. भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. पण त्याचं पुनरागमन पंचांच्या एका निर्णयामुळं वादात सापडलं आहे. (Virat Kohli Out Or Not Out?)

भारतीय सलामीवीरांनी 80 धावांची सलामी दिली पण न्यूझीलंडचा स्पिनर गोलंदाज एजाज पटेलनं भारतीय सलामीवीर शुभमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर लगेच पुजाराचा बळी घेण्यात एजाज पटेलला यश आलं. लागलीच आलेला भारतीय कर्णधार कोहलीला पंचांनी LBW बाद दिल्यानं सर्व गोंधळ निर्माण झाला आहे.

विराटला बाद देण्याचा निर्णय हा अयोग्य होता असं टीव्ही स्क्रिनवर दिसत आहे. परिणामी विराटला बाद दिल्यानं सर्वस्तरातून पंचांच्या निर्णयवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विराट बाद होताच नाॅट ऑऊट विराट हा हॅशटॅग तब्बल 3.5 लाख भारतीयांनी ट्विटरवर ट्विट केला आहे. इतकच नाही तर बीसीसीआयनंही (BCCI) आऊट की नाॅट आऊट? असं प्रश्नचिन्ह वापरत ट्विट केलं आहे.

दरम्यान, विराट कोहली भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज असल्यानं भारतीय संघ कसोटीमध्ये अडचणीत सापडला आहे. विराट कोहलीला आऊट दिल्यानं पंचावर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. त्याचबरोबर भारतीय समर्थक देखील नाराज झाल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या 

परमबीर सिंहांनी पुन्हा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले, हे मोठं पाऊल उचलणार!

भर कार्यक्रमात कन्हैय्या कुमार आणि राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; पाहा व्हिडीओ

“रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही”; शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा

राज ठाकरे अॅक्शन मोडवर! महाराष्ट्र दौरा करणार, 6 डिसेंबरला पुण्यात

“माफी तर मागितली, पण प्रायश्चित्त कसं करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More