बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

मुंबई | कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना अवघ्या काही तासाभरात रंगणार आहे. सर्व क्रिकेच जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. इंग्लंडच्या साऊथेम्पटनमध्ये हा सामना होणार असून भारताने आपल्या 11 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

भारताने जाहीर केलेल्या संघात दोन अनुभवी फीरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. अंतिम अकरामध्ये शुभनम गिलला संधी देण्यात आली आहे. शुभमनला संधी मिळण्याची  धुसर शक्यता होती. मयंक अग्रवालला डच्चू दिल्याने क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. भारतानं सलामीवीर रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. त्यामुळे मयंक अग्रवालला बाहरे बसावं लागलं आहे. मयंक अग्रवालने या स्पर्धेत 12 सामन्यात 20 इनिंगमध्ये 43 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

रिषभ पंत आणि वृद्धीमान सहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश केला गेला होता. त्यातील फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतला संधी मिळाली आहे. तर वेगवान गाेलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र इग्लंडने अद्यापही आपला संघ जाहीर केला नाही.

भारतीय संघ- विराट कोहली कर्णधार , रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.  2019 च्या विश्वचषकमध्ये सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना तयार झाली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

‘या’ ठिकाणी मातीत सापडत आहेत हिरे; हिरे शोधायला हजारो लोकांची गर्दी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More