बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांना अडचणी

मुंबई | कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. या परीक्षेचा निकाल आज म्हणजे 16 जुलै 2021 ला दुपारी एक वाजता निकाल लागणार होता. मात्र त्याआधी निकालाची वेबसाईटच क्रॅश झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आज दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र लाखो विद्यार्थी एकाच वेळी निकाल बघत आहेत. त्यामुळे बोर्डाची निकालाची साईट क्रॅश झाली असेल अशी शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल बघण्यात अडचणी येत आहे. बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या डोन वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात येत होता. राज्यात यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 99.84 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

दरम्यान, राज्यात 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे. 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी होती. मार्च 2020 च्या तुलनेत यंदाचा निकाल 4.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत त्यांचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे.

थोडक्यात बातम्या-

“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील”

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

दहावीचा निकाल अखेर जाहीर; कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, भाजप हा ओबीसींचाच पक्ष – देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More