बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात”

मुंबई | कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 11 एप्रिलची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. तर पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर 9 वी तसेच 11 वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणं हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखं होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवून विद्यार्थ्यांचा या महामारीच्या धोक्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला. दहावी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असते. परंतु मागील दोन महिन्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने वाढलेले आहे. राज्यातील सरकारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीच्या संघर्षात लढा देत आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर, त्यातून अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करावी, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांकडूनही बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे अभ्यास अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडलेले दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी; नवाब मलिक यांनी दिली माहिती

‘2 दिवसांनी लाॅकडाऊन लागणार आहे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं व्यापाऱ्यांना महत्वाचं आवाहन

“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही”

मोराच्या फार जवळ जाणं अंगलट, ‘या’ अभिनेत्रीच्या थेट अंगावरच मारली उडी!

“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More