बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणात सर्वात मोठी घडामोड, ‘या’ व्यक्तीला अटक

पुणे | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) एनसीबीनं मोठा छापा टाकला होता. या छाप्यात क्रुझवरुन अनेक मोठमोठ्या व्यक्तींना ताब्यात घेतलं. विशेषतः आर्यन खानला (Aryan Khan) या प्रकरणात अटक करण्यात आल्यावर देशभरात एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली.

आर्यन खान प्रकरणात प्रमुख पंच असलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली पुणे पोलिसांनी अटक केली. आर्यन खान प्रकरणात पंच किरण गोसावीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

गोसावीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी नोकरीच्या निमित्तानं फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली होती. विजय कुमार सिद्धलिंग कानडे या 33 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, किरण गोस्वामीवर पहिलेच अनेक आर्थिक फसवणुकीचे गु्न्हे दाखल असून यात आता आणखी एक भर पडली आहे. गोसावीनं आता 2 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली असून भोसरी पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीेवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

“तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो”

“ड्रग्ज अल्प प्रमाणात बाळगल्यावर गुन्हा मानला जाणार नाही”

तुमच्या कार्यक्रमांवर आता महापालिका ठेवणार वॉच; गर्दी आढळून आली तर…

“सर्व कर्जबुडव्यांचा शोध घेतला जाईल आणि आपल्या देशाचा पैसा परत आणला जाईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More