Top News क्राईम देश

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

Photo Credit- Facebook | bjp

कोलकाता | कोकीन ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना कोलकाता पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याची सवय असल्याचा दावा कोलकाता पोलिसांनी केला आहे. पामेला यांच्या वडिलांकडून अशी माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पामेला यांना त्यांच्या एका मित्रामुळे ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती. पामेला यांना ड़्रग्ज घेण्याची सवय असल्यामुळे पामेला यांच्या वडिलांनी त्यांची काळजी घेण्याचे सांगितल्याचेही कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे. पामेला गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलच तापलं आहे. पामेला यांना या प्रकरणात मुद्दामहून गोवले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

पामेला गोस्वामी यांनी त्यांच्या पक्षातीलच भाजप खासदार राकेश सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. राकेश सिंह यांनीच ड्रग्जच्या प्रकरणात फसवल्याचा आरोप पामेला गोस्वामी यांनी केला आहे. मात्र, भाजप खासदार राकेश सिंह यांनी पामेला यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे कारस्थान तृणमूल काँग्रेसने केलं असल्याचं, राकेश सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पामेला गोस्वामी 20 फेब्रुवारी रोजी आपल्या कारमधून कोकीन हे ड्रग्ज घेऊन जात होत्या. पोलिसांना याबाबत खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडल्या गेल्या. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात त्यांची गाडी अडवली. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले आहे.

थोडक्यात बातम्या-

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”

पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या