युक्रेनच्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, पाहा फोटो
नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेममध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळत होतं. अखेर हे तणावाचं सावट युद्धात बदललं आहे. त्यामुळे जगभरात याचे पडसाद दिसून येत आहे. सध्या दोन्ही देशांमधील अनेक गोष्टी समोर समोर यायला लागल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत आहे. ती एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. चर्चेचा विषय ठरतोय तिचा टॅटू. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव नतालिया कोझीनोवा आहे.
अभिनेत्रीने पाठिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॅट्यू काढला आहे. त्यामुळे तिच्या टॅटूचीच चर्चा सर्वत्र दिसत आहे. २०१५ साली पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा टॅटू पाठीवर काढल्यामुळे नतालिया चर्चेचा विषय बनली होती. भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने या टॅटूद्वारे व्यक्त केला होता.
दरम्यान, नतालिया कोझीनोवानं हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ती मूळची युक्रेनची असून तिच्याकडे युक्रेनचं नागरिकत्व आहे.
थोडक्यात बातम्या –
Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
“बाळासाहेब म्हणायचे दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”
रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू
Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”
Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर
Comments are closed.