बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघाच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

मुंबई | सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा आणि भारतीय कसोटी संघातील फलंदाज याचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय कसोटी संघातील फलंदाजाला आयपीएल 2021 मध्ये कोरोना झाला होता. त्यानंतर तो वीलगीकरणात होता. आयपीएलमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्पर्धा स्थगित करावी लागली.

सहाचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण पुन्हा चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत आहे. त्याच्या शरीरात कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. असं त्याने सांगितलं होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवत होता. जराही विलंब न लावता मी वीलगीकरणात गेलो. त्यादिवशी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु मला वीलगीकरणात कायम ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी मला ताप येण्यास सुरुवात झाली आणि तीन दिवसानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

आता सहाचा तिसरा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानं त्याला वीलगीकरणातच रहावे लागेल. बीसीसीआयनं निवडलेल्या 20 सदस्यीय संघात त्याची निवड झाली आहे. या दौऱ्याला जाण्यापूर्वी बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी करणार आहे आणि त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या खेळाडूचा इंग्लंड दौरा तिथेच रद्द होईल, हे बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर्स, लक्ष्मीपती बालाजी, मायकल हस्सी, टीम सेईफर्ट, अमित मिश्रा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 20 जणांच्या सदस्यांमधील प्रसिद्ध कृष्ण याचाही कोरोना रिपोर्ट नुकताच पॉझिटिव्ह आला आहे. त्यात आता वृद्धीमानचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानं टीम इंडियाचं टेंशन वाढलं आहे. सहानं सांगितले होते की, मला सुरुवातीला खूप भीती वाटली. माझे कुटुंब देखील चिंतित होते, असं साहाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘जयंत पाटील हे तर…’; पाटलांच्या नाराजीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले….

देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका, लस घेतलेल्या नागरिकांसाठी ‘या’ देशाच्या नव्या सूचना!

सर्वात प्रभावी Sputnik V लशीची किंमत जाहीर, इतक्या रुपयांना मिळणार!

“मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला अन्…”; पुष्कर जोगला रडू आवरेना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More